Login

"काय माझा गुन्हा...?" भाग १

आजही या देशात जातीयवाद कसा लोकांच्या मानगुटीवर बसलेला आहे... त्यामुळे एखाद्या कमी जातीतील स्त्रीचे जेव्हा आंतरजातीय विवाह होतो... तेव्हा त्या स्त्रीचे आयुष्य कसं नरक होतं, तीला कस संकटांनां सामोरं जावं लागतं... हि आजही घडत असलेली दाहक वास्तविकता या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे...

दिर्घ कथा लेखन...
डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६...


"काय माझा गुन्हा..." भाग १



"गौरवी... बाहेर ये... बाहेर ये लवकर..."

" गौरवी ऐकायला येत नाही का तुला... लवकर बाहेर ये..."
माधव ऑफिस मधून घरी येताच सोफ्यावर बसतो आणि अचानक समोरच्या व्यक्तीला पाहून संतापाने तो आपल्या बायकोला म्हणजे गौरवीला रागाच्या भरात तावातावाने आवाज देतो...

" अहो काय झालं... असं का माझ्या नावाने ओरडताय...?
गौरवी आपल्या बेडरूम मधून आपल्या हातात ओला टॉवेल घेऊन चेहरा पुसत बाहेर येत विचारते

" काय झालं... तुला काय लाज लज्जा आहे कि नाही..., कि ती शरम तु विकून खाल्लीस... कि ती चव्हाट्यावर नेऊन ठेवलीस..." माधव रागारागाने आणि मोठमोठ्याने ओरडत बोलतो.

"अहो काही काय बोलताय... वेड लागल्यासारखे.. काही पण काय बडबडताय..." गौरवी न समजल्यामुळे विचारते

"हो आज मला वेडच लागलंय... आणि ते ही तुझ्यामुळे...त्याला तुच कारणीभूत आहेस..." माधव रागारागाने बोलतो

"तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट शब्दात सांगा.‌‌..वाट्टेल ते काही ही बडबडू नका... आणि मी काहीही वाट्टेल ते ऐकून घेणार नाही..."

"वाट्टेल ते बोलत नाही आहे मी... आणि मुळात तुला लाज नाही वाटत का ग असे दिवसाढवळ्या असले घाणेरडे धंदे करायला...."

" अहो काय बोलताय तुम्ही दिवसाढवळ्या, घाणेरडे धंदे
वगैरे... तुम्ही नक्की काय बोलताय तेच आधी मला काहीच कळत नाही... जरा स्पष्टच काय ते बोला ना... नक्की असं काय केले आहे मी....?"

"किती निर्लज्ज आणि नालायक मुलगी आहेस ग तू... स्वतःचे हे असले घाणेरडे चाळे स्वतःच्या नवऱ्याच्या तोंडून ऐकायला लाज नाही वाटत का ग तुला..." गौरवीची सासुबाई सविता देवी रागाने बोलते...

"अहो आई... नक्की कशाबद्दल आणि काय बोलत आहात तुम्ही सर्वजण... आणि कसले घाणेरडे धंदे केले मी...?
ते कळेल का मला आणि हा माणूस कोण आहे ...? आणि त्याला असा का पकडून ठेवला आहे...? चोर आहे का तो....? गौरवीच्या मनातला गोंधळ..., राग...,  प्रश्न तीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता...

"वा वा काय नाटक करते रे ही दादा बघ... खुप चांगली कलाकार आहे रे हि...हिला चित्रपटात चांगले काम मिळेल...एवढी सुंदर नाटक करते...." गौरवीची ननंदबाई संस्कृती हाताने टाळ्या वाजवत बोलते...

"अहो... हा काय प्रकार आहे...? आणि नक्की काय चालू आहे...? मला जरा सरळ आणि सविस्तर सांगाल का तुम्ही...?

"तुला खरंच काहीच माहीत नाही...?" माधव रागाने आणि आश्चर्याने विचारतो...

"अरे असा काय बोलतोस...? मला काहीच माहीत नाही... इथे नक्की काय चालु आहे ते... म्हणूनच मी विचारले ना... आणि असा विचित्र नजरेने का बघतोयस...?" गौरी न समजल्यामुळे गोंधळून विचारते आणि विचारत पडते...

तेव्हा गौरीची सासुबाई सविता देवी एकवार आपल्या मुलाकडे म्हणजे माधवकडे बघते व पुन्हा गौरीकडे रागाने बघत बोलायला तोंड उघडते...

क्रमशः....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"